Tuesday 18 December 2012

पहिले शब्द , तसच आहे घर माझं.....




तसच आहे घर माझं.....
 

 तसच आहे घर माझं, डोंगराच्या छायेत.

जसं कोणी पोर झोपलं, आईच्या कुशीत.

 

तेवढच आहे घर माझं, देवाजिच्या डोंगरापुढे.

जेवढी हि अवनी आहे, आकाशातल्या सूर्यापुढे.

 

एकटच आहे घर माझंगावापासून दूर.

वासरू राहत जसं कळपाच्या मागावर.

 

तशीच आहे पाऊलवाट हि दूर जाणारी

मरणाऱ्याला घेऊन जाते जशी स्वर्गदारी

 

सारवलेल्या अंगणी रांगोळी  तशीच दिसे

पौर्णिमेच्या रात्री जसा पूर्णचंद्र दिसे.

No comments:

Post a Comment